साईमत नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांना त्या कारणाने चर्चेत होती, मागील अध्यक्ष व संचालक मंडळाचे वाद-विवादामुळे बँकेतून मोठ्या प्रमाणावर ठेवी परत गेल्या बँकेची निवडणूक झाली त्यात बँकेचा माजी अध्यक्ष व अनेक संचालकाना सभासदांनी पराभव दाखविला मागील संचालक मंडळातील चार पाच संचालक निवडून आले. इतर सर्व नवीन संचालक आहे.
बँकेचे माजी अध्यक्ष अरुण पांडव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे दिनांक २९ मार्च २०२३ रोजी निलंबित केले होते. त्या दिवशी बँकेचे प्रोसिडिंग बुक घेऊन पांडे पळून गेल्याची तक्रार माजी अध्यक्षांनी दाखल केली होती. आज रोजी साडेचार महिने उलटून गेल्यावरही निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे पदावर कसे काय काम करत आहे ? अध्यक्षांनी निलंबित केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे यांनी कोणत्या कोर्टातून स्थगितीचे आदेश आणले आहे ? कोणत्या कायद्यानुसार निलंबित व्यक्ती काम करत आहे ? त्याचा खुलासा नवनिर्वाचित अध्यक्ष चंपालालजी झंवर उपाध्यक्ष दत्ताजी सुपे व संचालक मंडळ करतील काय ? निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी काम करीत असल्यामुळे सभासद ग्राहकांची एक प्रकारे फसवणूकच होत आहे. तरी संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी सभासदांमधून होत आहे.