साईमत सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर जरंडी प्राथमिक केंद्रअंतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदेच्या शाळेवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “The Grace mission” छत्रपती संभाजीनगर यांच्या उपक्रमातून इयत्ता पहिली ली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, नोटबुक पेन या शालेय साहित्याची वाटप करण्यात आली यावेळी आकाश उजगरे ,योगेश साबळे,प्रतिक गायकवाड ,पावन रोकडे वसीम शेख सर ,मिलिंद कोल्हे सर , संतोष मोरे राजेंद्र मोरे दशरथ चौधरी दीपक भोटकर यांची उपस्थिती होती रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर या उपक्रमामुळे आदीवासी विद्यार्थ्यांचा चेहरा खुळून आला होता.