साईमत, प्रतिनिधी, जळगाव
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये सोमवारी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. गीतगायन स्पर्धेची सुरूवात सरस्वती व भारतमाता प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य प्रविण सोनवणे व समन्वयिका स्वाती अहिरराव उपस्थित होत्या. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते दुसरी लहान गट व इयत्ता तिसरी ते पाचवी मोठ्या गटासाठी ठेवण्यात आली होती. स्पर्धा हाऊसनुसार विभागण्यात आली होती.
नेताजी हाऊस, राणी लक्ष्मीबाई, आझाद आणि टिळक हाऊस असे गट करण्यात आले होते. कार्यक्रम प्रमुख गणेश देसले आणि ज्ञानेश्वर पवार होते. परीक्षक म्हणून रंजना बाभुळके आणि स्वाती देशमुख होत्या. विद्यार्थ्यांनी हावभाव सहित देशभक्तीपर समूह गीत सादर केले. शेवटी स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. त्यात लहान गटात प्रथम क्रमांक टिळक हाऊसने मिळवला आणि व्दितीय क्रमांक राणी लक्ष्मीबाईने मिळवला. मोठ्या गटात प्रथम क्रमांक नेताजी हाऊस आणि व्दितीय क्रमांक टिळक हाऊसने मिळवला. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.