साईमत, जळगाव, प्रतिनिधी
शहर महानगरपालिका माजी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत हँड्स ऑफ होप ग्रुपच्या वतीने भव्य मोफत वृक्ष वाटप उपक्रम रविवारी राबवण्यात आला. सदर कार्यक्रमात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महापौरांच्या हस्ते नागरिकांना रोपे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. एक नागरिक या नात्याने आपण समाजाला काही दिले पाहिजे यासाठी या कार्यक्रमात वेगवेगळ्या महाविद्यालयीन 15 ते 20 विद्यार्थ्यांंनी एक ग्रुप तयार करून स्वखर्चातून एक मदतीचा हात म्हणून गरजू व्यक्तींना कांबळी वाटप, जीवनावश्यक वस्तू वाटप, अन्न वाटप , भटक्या पाळीव कुत्र्यांना वाचवण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह बेल्स घातले, गाईचे रक्षण, भटक्या पाळीव प्राण्यांना जखमी झाल्यावर औषधोपचार करणे, उन्हाळ्यात चौकाचौकात पाणपोई उभारणे , पक्षांसाठी घरोघरी अन्न व पाण्याची सोय अशा विविध कार्यक्रमातून कामे करण्यात आली आहे. गरजू व्यक्तींना एक मदतीचा हात दिला आहे. या कार्यक्रमात आमदार राजू मामा भोळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व एक मदतीचा हात दिला आहे. या विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात द्यावा. त्यांचे कौतुक करून यांना प्रोत्साहन द्यावे. संस्थापक मेहुल बैसाणे , प्रियंका बैसाणे, गणेश पाटील, मयूर पिसाळ, निशांत पाटकरी, राहुल पवार, महेंद्र पाटील, काजल बैसाणे, सचिन पाटकरी, नुपूर, अनुश्री आदी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला आहे.