Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावच्या राजा श्री गणेशाचे नेहरु चौक मित्र मंडळातर्फे पाटपूजन
    जळगाव

    जळगावच्या राजा श्री गणेशाचे नेहरु चौक मित्र मंडळातर्फे पाटपूजन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे रविवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जळगावच्या राजा श्री गणेशाचे पाटपूजन व मंडप सोहळा महानगरपालिकेच्या इमारतीखाली उत्साहात पार पडला. याप्रसंगी भाविकांनी ढोल ताशांच्या तालावर जल्लोष केला. यावेळी भाविकांच्या उत्साहात लक्षवेधी अशा ढोल पथकाचे उत्तम सादरीकरण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नेहरू चौक मित्र मंडळातर्फे रविवारी जळगावचा राजा श्री गणपती यांचे पाटपूजन व मंडप सोहळा आयोजित केला होता. यंदाचे ३७ वे वर्ष आहे. धीरज व रुचिता अग्रवाल या दाम्पत्याच्या हस्ते पाटपूजन पवित्र मंत्रघोषात पार पडले. पाटपूजननंतर श्री गणपतीची महाआरती मान्यवरांच्या हस्ते झाली.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जनता बँकेचे संचालक ललित चौधरी, ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टचे दीपक जोशी, माजी नगरसेवक अमित भाटिया, किशोर भोसले, श्री नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी हे उपस्थित होते.

    ढोल पथकाचे उत्कृष्ठ सादरीकरण
    महाआरती झाल्यानंतर आकर्षक असे शिवगंध संस्थेच्या ढोल पथकाचे सादरीकरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी नेहरू चौक रांगोळी व फुलांनी सुशोभित केला होता. महिला व पुरुष भाविकांनी पारंपारिक वेशभूषामध्ये उपस्थिती दिली होती. यशस्वीतेसाठी श्री नेहरू चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आभार अश्विनीकुमार काळुंखे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : चोरीच्या संशयावर तरुणावर प्राणघातक हल्ला

    March 25, 2026

    Bhusawal : भुसावळ तिकीट तपासणीत १० ‘करोडपती’ कर्मचाऱ्यांचा विक्रम

    March 25, 2026

    Bhusawal : भुसावळ तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.