Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»८ संघ खेळणार; ४० नामांकित खेळाडूंचा समावेश
    क्रीडा

    ८ संघ खेळणार; ४० नामांकित खेळाडूंचा समावेश

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रत्नागिरी ः वृत्तसंस्था

    उदय सामंत फाऊंडेशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आमंत्रितांची रत्नागिरी कॅरम लीग सिझन ६ आज रविवार दि. १३ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील देसाई बोँट हॉल, येथे प्रारंभ होत आहे.
    महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत व्हिक्टोरियन्स, कॅरम मास्टर्स, सत्यशोधक स्ट्रायकर्स, शिवगर्जना लायन्स, कॅरम लव्हर्स, जैन सुप्रिमोस, मुंबई मास्ट्रोस आणि यंगस्टर्स असे एकंदर ८ संघ खेळणार असून यात महाराष्ट्रातील तब्बल ४० नामांकित खेळाडूंचा समावेश असेल.भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑइल, इन्फिगो आय केअर, ओएनजीसी व पितांबरी यांचा पुरस्कार लाभलेल्या या लीगमध्ये विश्व्‌‍‍विजेते संदीप दिवे, प्रशांत मोरे, योगेश परदेशी तसेच आंतरराष्ट्रीय कॅरमपटू महम्मद घुफ्रान, संदीप देवरुखकर, रियाझ अकबर अली, अभिजित त्रिपनकर, प्रकाश गायकवाड,अनिल मुंढे,अशोक गौर, दिलेश खेडेकर, संजय मांडे यांच्या व्यतिरिक्त माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडेचा सहभाग असेल.
    तर पहिल्यांदाच या लीगमध्ये महिलांचा समावेश केला असल्याने काजल कुमारी, संगीता चांदोरकर,ऐशा साजिद खान व आकांक्षा कदम या खेळाडूंचा खेळ रत्नागिरीवासियांना बघायला मिळणार आहे. साखळी पद्धतीने खेळविण्यात येणाऱ्या या लीगमध्ये १ एकेरी, १ दुहेरी व १ मिश्र दुहेरी असे सामने खेळविण्यात येणार असल्याने स्पर्धा रंगतदार होणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू रियाझ अकबर अली,अभिषेक चव्हाण व आकांक्षा कदम यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच रत्नागिरी व रायगड जिल्याचे पालकमंत्री उदय सामंत गेली ५ वर्षे सातत्याने कॅरम या खेळाला प्राधान्य देऊन या स्पर्धेला सर्वतोपरी मदत करत आहेत.स्पर्धेचे उदघाटन ना. सामंत यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी देवेंदर सिंह हे भूषविणार आहेत. याप्रसंगी किरण सामंत (उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ), धनंजय कुलकर्णी (पोलीस अधीक्षक), कीर्तिकिरण पुजार( मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.),महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे जितेंद्र शहा (अध्यक्ष), भारत देसडला (कार्याध्यक्ष), यतिन ठाकूर (उपाध्यक्ष), मंजूर अहमद खान (उपाध्यक्ष), अरुण केदार (मानद सचिव), अजित सावंत (खजिनदार),गोपाळ शेलार (माजी अधिकारी,भारतीय आयुर्विमा महामंडळ),सुरेश अय्यर (महाव्यवस्थापक, इंडियन ऑइल),सुशांत देशपांडे (रत्नागिरी शाखाधिकारी, भारतीय आयुर्विमा महामंडळ), डॉ.श्रीधर ठाकूर ( इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी), श्याम देशपांडे (प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी ) तसेच रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे प्रदीप भाटकर (अध्यक्ष),मिलिंद साप्ते (सचिव), नितीन लिमये (खजिनदार) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.