साईमत फैजपूर ता. यावल प्रतिनिधी
ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाम विस्तार सोहळ्याच्या वर्धापनदिनानिमित्त धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात कार्यक्रम घेण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भंगाळे यांच्या शुभहस्ते डॉ. रंगनाथन व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी डॉ. रंगनाथन व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विषयी माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथांचे महत्व व त्यांचे वाचन आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे समजवून सांगितले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन विद्यार्थी व प्राध्यापकाकरिता आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रा. डॉ. मच्छिंद्र पाटील, प्रा. डॉ. शेरसिंग पाडवी, उमाकांत पाटील सर, सहर्ष चौधरी, सुरेखा सोनवणे, भूषण पाटील यांचेसह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.