Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»आजादी का अमृत महोत्सव ‘मेरी मिट्टी,मेरा देश अभियान’ सावदा येथे डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण
    राजकीय

    आजादी का अमृत महोत्सव ‘मेरी मिट्टी,मेरा देश अभियान’ सावदा येथे डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण

    SaimatBy SaimatAugust 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत सावदा ता.रावेर प्रतिनिधी

    आजादी का अमृत महोत्सव ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत सावदा शहरातील विविध ८ भागांमध्ये सावदा नगरपरिषद व गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या सहकार्याने शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले. दिवसभरातील या उपक्रमात एकूण ७५ झाडांची लागवड करण्यात आली.

    मेरी मिट्टी मेरा देश या अभियांनातर्गत वृक्षारोपण या कार्यक्रमास बुधवार दिनांक ९ ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून विविध ठिकाणी शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
    जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रथमच आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली.
    ९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या ह्या अभियानात पहिल्याच दिवशी डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते नेरी दिगर, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, विटाळी ता नांदुरा, मलकापूर आदि ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. शुक्रवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सावदा शहरात ख्वाजा मशिद कॉलनी येथून वृक्षारोपणास सुरुवात झाली.
    याप्रसंगी डॉ.केतकीताई पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेविका सुभद्राबाई सिद्धार्थ बडगे, डॉ.उल्हास पाटील सीबीएससी इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल भारती महाजन, नगरसेवक गुड्डू शेठ, शब्बीर इब्राहिम, शेख अंनिस शेख इब्राहिम, अ‍ॅड.जावेद शेख, पत्रकार शेख मुख्तार, फरीद शेख, युसुफ शहा, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक रवी बेंडाळे, डॉ.संकेत भंगाळे, हबीब तडवी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.