Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»तुम्ही स्वप्न दाखवत होता, ती आम्ही साकारली
    राजकीय

    तुम्ही स्वप्न दाखवत होता, ती आम्ही साकारली

    saimatBy saimatAugust 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवीदिल्ली : वृत्तसंस्था

    जगभरातील देश आर्थिक संकटातून जात आहे परंतु अशा काळातही भारताची अर्थव्यवस्था मजबुतीने उभी आहे, असा दावा करीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातली वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिले.सीतारमण म्हणाल्या, “जगभरातली वाढती महागाई आणि घसरलेला विकास दर हा चिंतेचा विषय आहे.२०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था केवळ ३ टक्क्यांच्या वर गेली आहे. जागतिक बँकेच्या मते २०२३ मध्ये जागतिक विकास दर २.१ टक्क्यांपर्यंत खाली जाईल. ब्रिटनमधली परिस्थिती सर्वात बिकट आहे. दरम्यान, यावेळी विरोधकांवर हल्लाबोल करत अर्थमंत्री म्हणाल्या, तुम्ही आश्वासने देण्यात दंग राहिलात आणि आम्ही काम करण्यात व्यस्त राहिलो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे चित्र बदलले आहे.

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, जगभरातली परिस्थिती बिकट आहे. परंतु, त्यात चीन ही एक मोठी आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मी चीनच्या अर्थव्यवस्थेशी आपली तुलना करणार नाही परंतु ज्या अर्थव्यवस्था मजबूत मानल्या जात होत्या, त्या आज ग्राहकांच्या कमतरतेशी झगडताना दिसत आहेत. चीन, ब्रिटन आणि पाठोपाठ अमेरिकेची अर्थव्यवस्थाही घसरली झाली आहे. त्यामुळे त्यांचा शेअर बाजार हादरला आहे. ही परिस्थिती पाहून तुम्ही आता भारताची अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे.

    अर्थमंत्री म्हणाल्या की, २०१३ मध्ये मॉर्गन आणि स्टॅन्लेने भारताला सर्वात कमकुवत अर्थव्यवस्थेंच्या यादीत समाविष्ट केले होते. त्याच मॉर्गन स्टॅन्लेने आज भारताला अव्वल स्थानी ठेवले आहे. आज आपला देश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले आर्थिक धोरण इतकं सुधारले आहे की कोव्हिड संकटावर मात करून आपण नव्या ताकदीने उभे राहिलो आहोत आणि पुढे जात आहोत.

    निर्मला सीतारमण म्हणाल्या, जन धन योजना, डिजिटल इंडिया मिशन, आयुष्मान भारत, जन औषधी केंद्र अशा योजनांचा सर्वांना फायदा झाला आहे. गेली सहा दशके आपण ‘गरिबी हटाओ’ असा नारा ऐकत होतो, पण तसे झालं का? परंतु, आता आपण गरिबी दूर केल्याचे चित्र तुम्ही पाहताय
    केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, पूर्वी आपण फक्त बनवू, उभारू, तयार करू असल्या घोषणा ऐकायचो, आता मात्र बनवलं, उभारलं, तयार केले असे ऐकतोय. तुम्ही (विरोधक) फक्त स्वप्नं दाखवत होता, परंतु आम्ही जनतेची स्वप्न साकार करत आहोत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.