साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार “मेरी माटी मेरा देश” जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने केले आहे. त्या अनुषंगाने पाळधी बुद्रुक आणि पाळधी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत स्वतंत्र शिलाफलक उभारण्यात आला आहे. ज्या व्यक्तींनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे. त्यांनी बलिदान दिले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिलाफलकावर माल्यार्पण करून दिवे लावण्यात आले.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी दिनकर पाठक यांनी उपस्थित ग्रामस्थांना पंचप्राणाची प्रतिज्ञा दिली. त्यानंतर गावातील माजी सैनिक विजय सपकाळे, सचिन महाले, विजय चव्हाण, रायभान नन्नवरे, मोहन सूर्यवंशी यांचा सत्कार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, एपीआय प्रमोद कठोरे, धरणगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास पाटील, विस्तार अधिकारी व्ही.एम.महाजन योगेंद्र अहिरे, तलाठी प्रशांत पाटील, कोतवाल धनराज भोई, सरपंच लक्ष्मी शरद कोळी, उद्योजक दिलीप पाटील, शेतकी संघाचे सदस्य संजय महाजन, माजी सरपंच प्रकाश पाटील, डॉ.व्ही.डी.पाटील, गोपाल सोनवणे, शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल कासट, अरविंद मानकरी, शरीफ देशपांडे, पवन माळी, अमीन पटेल यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.