साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील वि.का.सो.च्या स्वस्त धान्य दुकानात मातीचे दिवे लावून गहू, तांदूळ, साखरचे वाटप करून “मेरी मिट्टी मेरा देश” अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी मिट्टी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
यावेळी सेल्समन उज्ज्वल पालीवाल यांनी लाभार्थ्यांना अन्नदिनानिमित्त अन्नधान्याचे महत्व समजावून सांगितले. यावेळी पाचोराचे तहसीलदार संजय चव्हाण, पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले, लोहारा सोसायटीचे चेअरमन सुनील क्षीरसागर, संचालक भडके, रामदास देशमुख, सेल्समन आबा चौधरी, कर्मचारी वृंद मनोज अंबिकार, जितेंद्र पालीवाल, पत्रकार दीपक पवार, दिलीप चौधरी, अनिल तडवी गावातील नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी उज्ज्वल पालीवाल यांनी परिश्रम घेतले