शहापुराला ३० लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

0
25

साईमत,  लोहारा, पाचोरा : वार्ताहर

पाचोरा तालुक्यातल शहापूरा येथे मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे मंजूर केलेल्या स्थानिक आमदार निधी आणि मूलभूत सुविधाअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजपाचे कैलास चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात गावातंर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख, गावातंर्गत रस्त्यावर काँक्रीटीकरण करणे १० लाख, नवीन स्मशानभूमी बांधकाम करणे, कंपाऊंड, गेट व अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख अशा विकास कामांचा समावेश आहे.

यासह ९० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच या कामांचे लोकार्पण ना. गिरीश महाजन, जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. भूमिपूजन आणि लोकार्पणप्रसंगी शहापुराचे सरपंच योगेश परदेशी, रामेश्वरचे सरपंच दत्तु राठोड, माजी सरपंच रमेश परदेशी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here