माजी आमदार अनिल गोटेंची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी

0
53

साईमत, धुळे ः प्रतिनिधी

शरद पवार गटाचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेश अध्यक्ष, माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे आज जाहिर केले. इतकेच नाही तर आपण कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल गोटे हे अजित पवार यांना पािंठबा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी अनिल गोटे यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षांतर्गत होत असलेल्या गटबाजी बाबत उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडण्याचा विचार करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आपली गटबाजीमुळे घुसमट होत असून याला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here