रेल्वेचे विस्कळीत वेळापत्रक पूर्ववत करा

0
10

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथून मुंबई येथे जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजेनंतर गाडी नसल्याने ‘पंजाब मेल’ आणि ‘विदर्भ एक्सप्रेस’ या गाड्यांना थांबा मिळावा, देवळाली-भुसावळ पॅसेजरचे (मेमो) डबे वाढवून त्या गाडीची वेळ पूर्वीच्या देवळाली-भुसावळ शटलच्या वेळेनुसार करावी, कोरोना काळात विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक पूर्ववत करण्यात यावे, अशा आशयाच्या मागण्यांचे निवेदन पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीतर्फे पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक यांना नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीचे ॲड. अविनाश भालेराव, सुनील शिंदे, खलील देशमुख, भरत खंडेलवाल, संजय जडे उपस्थित होते. जनतेच्या संतप्त भावनांना सनदशीर मार्गाने व्यक्त करण्यासाठी ‘क्रांतीदिनी’ बुधवारी, ९ ऑगष्ट रोजी पाचोरा रेल्वे स्टेशन समोर धरणे आंदोलनासह निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीतर्फे स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आला आहे.

गेल्या २ ते ३ वर्षांपासून पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती, पाचोराच्या माध्यमातून पाचोरा तालुका आणि परिसरातील तीन – चार तालुक्यातील प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोईच्या विरोधात सातत्याने आंदोलन करीत आहोत. कृती समितीच्यावतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत.

रेल्वे प्रशासनाचे मागणीकडे दुर्लक्ष
तत्कालीन जी.एम. आणि डी. आर. एम. यांच्याशी प्रत्यक्ष वेळोवेळी भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या आणि व्यथा मांडण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधींना साकडे घालून थेट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटुन प्रवाशांच्या समस्यांच्या निराकरणाची विनंतीही केली आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. यामुळे जनतेतून संतप्त भावना संतप्त उमटू लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here