Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटून चर्चा करू शकतात
    राजकीय

    दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटून चर्चा करू शकतात

    SaimatBy SaimatAugust 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था

    शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्याकरता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवरून राजकारणातून अनेक तर्क वितर्क लढवले जात असताना संजय राऊतांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आज ते दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
    संजय राऊत म्हणाले की, ते दोघे भाऊ आहेत. दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटू शकतात, चर्चा करू शकतात. यामध्ये तिसऱ्या माणसाला पडण्याची गरज नाही. मी दोघांनाही ओळखतो, दोघांशीही माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत पण राजकीय विषय येतो, तेव्हा मी मनापासून माझे पूर्ण कुटूंब आणि सहकारी कायम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत.

    तर एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रात होईल
    “मुळात एनडीए आहे का? आमच्यातून तुटलेला एक गट, एनसीपीतून तुटलेला एक तुकडा आणि इतर गोळा केलेले ताकडे-तुकडे. मुळ एनडीए कुठे आहे? मूळ एनडीए म्हणजे शिवसेना, अकाली दल, जनता दल युनायडेट, डीएमके, तृणमूल काँग्रेस, या मुख्य पक्षांनी बनवलेला एनडीए होता. कालपर्यंत आपण ‌‘एक मोदी सबपर भारी’, आम्हाला कोणाची गरज नाही, असे म्हणत होते. मग आता तुम्हाला आम्ही इंडिया स्थापन केल्यावर एनडीएची गरज का भासतेय?” असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला.

    “त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, २०२४ च्या निवडणुकीत समोरे जाताना आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हा पक्ष तोडा, तो पक्ष तोडा आणि मग एनडीएचे शेपूट जोडा. ते महाराष्ट्र सदनात येणार असतील पण एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार. इतिहासातील सर्वांत मोठा पराभव कुठे होणार असेल तर बिहार ,महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणा या प्रमुख एनडीएचा पराभव होईल, असेही संजय राऊत म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.