Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»‘त्या‌’ नराधमाला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे : चित्रा वाघ
    क्राईम

    ‘त्या‌’ नराधमाला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे : चित्रा वाघ

    SaimatBy SaimatAugust 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

    एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की, अशा नराधमांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, असे कृत्य त्याने केले आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशीची शिक्षा मिळेल, असा विश्वास भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

    भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची मंगळवारी सांत्वनपर भेट घेतली. त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. याव्ोळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीडित परिवारासाठी दिलेली आर्थिक मदत परिवाराच्या स्वाधीन केली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शासन, पोलीस यंत्रणेसोबत समाजानेही सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. शासन पातळीवर महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे सक्षम आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लक्ष देणे महत्वाचे असल्याचेही वाघ यांनी म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    March 15, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026

    Parola : लोणी शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे स्वागतार्ह वाटप

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.