मन्यारखेड्यात भांडण सोडवणाऱ्या महिलेवर कोयत्याने वार

0
26

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

हंडामोर्चात सहभागी न झाल्याने एकाला त्याच्या वहिनी व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाला गावातील तीन जणांनी लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. तसेच महिलेच्या हातावर कोयत्याने वार केल्याची घटना तालुक्यातील मन्यारखेडा येथे घडली होती. याप्रकरणी सोमवारी परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण सहा जणांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मन्यारखेडा येथे हंडामोर्चा काढण्यात आला होता. त्यात संजय बळीराम बागले (वय 54, रा. मन्यारखेडा) हे सहभागी न झाल्याने गावातील बापू दगडू मोरे, सुनील बापू मोरे व अन्य एकाने लोखंडी पाईप बागले यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. हे भांडण सोडविण्यासाठी बागले यांच्या विहिनी मंगलाबाई या आल्या असता एकाने कोयत्याने त्यांच्या हातावर वार केला होता. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बागलेस मारहाण करणाऱ्या सुनील बापू मोरे (वय 22, रा. मन्यारखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे मामा ताराचंद महारु बागले यांच्या घराजवळ संजय बळीराम बागले व अन्य दोन जणांनी फिर्यादीचे वडील बापू मोरे यांच्या डोक्यात पावडा मारुन दुखापत केली. हे भांडण सोडविण्यासाठी ते गेले असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावरून तीन जणांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार हरीष पाटील हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here