साईमत फैजपूर प्रतिनिधी
भारत देश जागतिक स्तरावर महासत्ता होण्यासाठी देशातील गुणवंत विद्यार्थी व युवकांनी राष्ट्र कार्यासाठी महत्व देऊन राष्ट्र कार्यात स्वतःला झोकून दयावे असे आवाहन सातपुडा सोसायटी चेअरमन तथा विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी केले. सातपुडा सहकारी सोसायटीने गुणवन्त विद्यार्थी गौरव कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
नरेंद्र नारखेडे यांनी पुढे बोलतांना विद्यार्थी व युवकच उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आहे यामुळे युवकच देशाला महासत्ता बनऊ शकतात असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेत सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांचा माजी नगराध्यक्ष चोलदास पाटील, पांडुरंग सराफ, तसेच संचालक चंद्रशेखर चौधरी, प्रा. पदमाकर पाटील, सुनील वाढे, दूध डेअरीचे चेअरमन हेमराज चौधरी, प्रल्हाद बोरोले, गिरीश पाटील, केतन किरंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय कुमार परदेशी, अनिल नारखेडे, वामन नेहते, राजेश महाजन, अप्पा चौधरी, कमलाकर भंगाळे, संस्थापक चेअरमन सुरेश पाटील, दूध संघ संचालक नितीन चौधरी, मसाका कामगार युनियन अध्यक्ष किरण चौधरी, योगेश भावसार, सुनील नारखेडे, भूषण नारखेडे, आदी पदाधिकारी , सभासद , विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक काशिनाथ वारके, सहव्यवस्थापक किशोर नेहते, वसुली अधिकारी विजय कुमार सावकारे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभार व्हा. चेअरमन चंद्रशेखर चौधरी यांनी मानले.