Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पाचोऱ्यात २१ वर्षीय तरुण-तरुणीने घेतला गळफास
    क्राईम

    पाचोऱ्यात २१ वर्षीय तरुण-तरुणीने घेतला गळफास

    SaimatBy SaimatAugust 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा, प्रतिनिधी 

    शहरातील मानसिंगका कॉलनी येथील २१ वर्षीय तरुण व पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणी यांनी आज दुपारी वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना ह्या परस्पर वेगळ्या असुन आत्महत्यांचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

    शहरातील मानसिंगका कॉलनी येथील रहिवाशी ललित राजाराम पाटील (वय २१) या तरुणाचा रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंचायत समितीच्या पडक्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संतोष राजपुत, गुणवंत पाटील हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करुन ललित यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. ललित पाटील वेल्डिंग दुकानावर काम करीत होता. त्याच्या पश्चात्य आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    शहरातील पुरुषोत्तमनगरातील रहिवासी राजश्री विरेंद्र पाटील (वय २१) या तरुणीने घरात कोणी नसताना राहत्या घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार शेजारच्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. राजश्री पाटील हिस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. मृत राजश्री पाटील ही जळगाव येथे शिक्षण घेत होती. राजश्री पाटील हिच्या वडिलांचे निधन झाले असून आई पुनगाव ग्रामपंचायतीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. राजश्री हिची आई चाळीसगाव येथे गेल्या होत्या. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहे. या दोन्ही तरुणांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Amalner : अमळनेर हादरले! भरधाव डंपरने तरुणाला चिरले जागीच मृत्यू

    March 15, 2026

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.