मुक्ताईनगर बस स्टँड टवाळखोर मुलांमुळे ठरतय वादग्रस्त

0
11

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर बस स्टँड येथे तालुक्यातील प्रवाशांची मोठी वर्दळ असते परंतु काही टवाळखोर व रोड रोमिओ मुलांमुळे त्या ठिकाणी वाद होत असून मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिक्षणासाठी खेड्या – पाड्यातून येणारी शाळकरी, कॉलेजच्या मुली तसेच प्रवाशी महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यामध्ये शाळा, कॉलेज, तहसील, पोलीस स्टेशन दवाखाना,हॉस्पिटल, पीडब्ल्यूडी ऑफिस, बँका, वीज वितरण असे विविध प्रकारचे मोठे मोठे ऑफिस या ठिकाणी येत असून आर्थिक देवाणघेवाण कागदोपत्री असा व्यवहार मुक्ताईनगर शहरांमध्ये होत असतो त्या अनुषंगाने मुक्ता नगर शहरांमध्ये रहदारीचे प्रमाण खूप असून खेड्यापाड्यातील लोक एसटी बसचा प्रवास करत असतात व बस स्टैंड वर येत असतात परंतु काही टवाळखोर मुलांमुळे व रोड रोमिओमुळे शाळकरी मुलींना व महिलांना खूप त्रास होत असल्याची चर्चा नागरिक करत आहे, काही टवाळखोर मुलांकडून कॉलेज शाळकरी मुलींचे नावे घेतली जातात परंतु भीतीपोटी काही मुली घरी अथवा पोलीस स्टेशनला सांगत नसून त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे काही मुली या अशा कारणामुळे शाळा कॉलेजेस साठी सुद्धा रेगुलर येण्यासाठी टाळाटाळ करत असतात पोलीस प्रशासनाची गाडी पोलीस स्टेशनला कोणी कॉल केला तर फेरी मारत असते परंतु त्या ठिकाणी एक कायमस्वरूपी होमगार्ड व महिला अथवा पुरुष पोलीस कर्मचारी यांची नेमणूक व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक वर्ग व नागरिकांमधून होत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचा झुंडचा झुंड मोठ्या प्रमाणात बस स्टँडच्या आवारामध्ये दिसत असतो त्यात विद्यार्थी कोणते आणि बाहेरचे मुले कोणते फरक दिसत नसून बस स्टॅन्ड वरती ठीक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसवण्यात आले तर या सर्व गोष्टीला आळा बसून शाळकरी मुला मुलींना याचा किंवा प्रवाशांना त्रास होणार नाही जर झालाच तर या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्व काही रेकॉर्ड होऊन आपण गुंडगिरी करणारे अथवा रोड रोमिओ ला याचा चांगलाच वचक बसेल व गुन्हा दाखल करायला पोलीस प्रशासनाला सोपे जाईल व टवाळखोर मुलांची दबंग गिरी कमी होईल अशी चर्चा वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here