आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

0
33

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील निपाणे येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून विषारी औषध प्राशन करत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शरद भगवान पाटील (वय ३५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तिन भाऊ असा परिवार आहे. शरद पाटील यांच्या अकस्मात निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील शरद भगवान पाटील या शेतकऱ्याने निपाणे शेत शिवारात विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने शरद पाटील यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शरद पाटील यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here