साईमत फैजपूर प्रतिनिधी
धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचे जागी प्रभारी प्राचार्य पदाची धुरा वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.
डॉक्टर अनिल भंगाळे यांनी नुकताच पदभार स्विकारला. या निमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.
