साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील आमोदे येथील कैलास भालेराव पाटील (वय 36) हा त्याच्या गट नं.59 मधील शेतात काम करीत होता. तेव्हा एमएससीबीचा पोलच्या लोखंडी आधाराच्या तारला शॉक लागून बेशुद्ध झाला. यानंतर शेताच्या परिसरातील इतर शेतात काम करणारे चंदनलाल दिलबर पाटील, नंदलाल दिलबर पाटील, अमृत काशीराम पाटील, जितेंद्र अमृत पाटील यांच्या मदतीने कैलासला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी कैलासची तपासणी करुन त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पी.एम.रूममध्ये ठेवण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहे.