साईमत सोयगाव प्रतिनिधी
कर्जाच्या ओझ्याखाली नैराश्य आल्या मुळे सोयगावात अल्पभूधारक शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे सहा वाजता शहरात घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे सोयगाव शहर सुन्न झाले असून, सोयगाव शहरात कर्जाला कंटाळून दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी गळफास घेतला आहे.
शहरातील नारळी बाग भागातील अतुल राजेंद्र देसाई (वय ३०) असे गळफास घेतलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून त्याचे कुटुंबियांच्या नावावर शेती तारण करून घेतलेले वाहन कर्ज तीस लाख रु आणि शेतीच्या खरीप हंगामासाठी घेतलेले ७० हजार रु जिल्हा बँकेचे कर्ज असे एकूण तीस लक्ष ७० हजार रु इतके कर्ज कुटुंबावर असून या कर्जाच्या परतफेडीच्या चिंतेने नैराश्य आलेल्या अतुल देसाई यांनी कर्जाला कंटाळून बुधवारी पहाटे राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांच्या नावे सोनसवाडी शिवारात चार एकर गट क्र ११२ शेती आहे.
सध्या खरिपाच्या हंगामाची स्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे उत्पन्न मिळणार नसल्याचे पाहून कर्जाच्या विवंचनेत त्याने गळफास घेतला दरम्यान त्यांचेवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी महसूल विभागाचे तलाठी विष्णू पवार यांनी घटनेचा पंचनामा करून तीस लाख ७० हजार रु कर्ज असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अतुलच्या पाश्चात्य आई वडील दोन भाऊ पत्नी एक बहीण दोन मुले असा परिवार आहे