साईमत अमळनेर प्रतिनिधी
येथील विजय नाना पाटील आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.एम. कोळी, शिक्षक शिवाजी पाटील, विद्यार्थ्यांचा वाढदिवस संयुक्तपणे सगळा स्टाफ, विद्यार्थ्यांसमोर साजरा करण्यात आला. निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक म्हणून शिक्षक भूमिका पार पाडतात. तसेच १ जुलैचा योग साधून प्राचार्य पी.एम.कोळी, विज्ञान शिक्षक शिवाजी पाटील आणि सहावीचा विद्यार्थी निशांत पारधी यांचा वाढदिवस संयुक्तपणे साजरा करण्यात आला.
अशी वेगळी संकल्पना ज्येष्ठ शिक्षक डी.डी.घोडेस्वार, ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील, सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील, सदस्य संजय पाटील, सदस्य व्ही.डी.पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, ज्येष्ठ व्ही.जी.बोरसे, बी.डी.पाटील, सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्ध प्रमुख अनिल पाटील तर सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील यांनी आभार मानले.