जल्हाधिकारी कार्यालयात 3 जुलै रोजी लोकशाहीदिनाचे आयोजन

0
47

साईमत जळगाव प्रतिनिधी

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही (Lokshahi) दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 3 जुलै, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाहीदिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाहीदिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here