14 वर्षा आतील फुटबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

0
18

साईमत जळगाव प्रतिनिधी

आंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा शिरपूर(ता.धुळे)येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे 25 मे पासून खेळवल्या जाणार असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा 14 वर्षातील मुलांचा संघ निवडण्यात आला. त्या संघाला आज जिल्हा क्रीडा संकुल येथे एका छोटेखानी समारंभातून निरोप देण्यात आला.

  संघात यांची झाली निवड
कर्णधारपदी अनुभूती शाळेचा आयुष भोर तर  उपकर्णधारपदी अमळनेरच्या सैय्यद अलतमशची निवड करण्यात आली.
ध्रव भुजवाणी,  तुषार गुजर, ॠषिकेश परदेशी, कौशतुब महाजन, ताबीश खान, देवेंद्र पाटील, अनय रडे
( सर्व जळगाव) सुशांत गायकवाड,आदित्य जोशी, प्रतीक सराफ, रयान रोस, आशुतोष मिश्रा, कलश गवले, लोकेश पाटील ( सर्व भुसावळ). मारूफ खान, सैय्यद अलतमश, कुणाल देवकाते (सर्व अमळनेर) संघ प्रशिक्षक म्हणून भूषण पाटील तर सहाय्यक प्रशिक्षक राहील अहमद हे राहतील. तर संघ व्यवस्थापक जैन स्पोर्टर्स अकॅडमीचा अब्दुल मोहसिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा संघटनांचे प्रतिनिधीची होती उपस्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here