सहजयोग ध्यान तर्फे विध्यार्थ्यांना जीवनातील ध्यानाचे महत्व

0
33

साईमत जळगाव प्रतिनिधी

केसीई  सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या सायन्स आणि हुम्यानिटिज विभागातर्फे विध्यार्थानसाठी सामूहिक ध्यान साधनेचे आयोजन करण्यात आले होते.

सहजयोग ध्यान केंद्राचे धीरज संगीत, संध्या पाटील, रुपाली चौधरी, श्री.दांडगे,  चंदु पाटील  आणि अविनाश सावळे  यांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेत योग, ध्यान साधना आणि विध्यार्थी जीवनात होणारा फायदा या विषयी प्रात्यक्षिक द्वारे समजावण्यात आले. या कार्यशाळेत प्रथम, द्वितीय  वर्ष अभियांत्रिकीच्या विधार्थ्यानी सहभाग नोंदवला. शैक्षणिक जीवनात ध्यान साधना एकग्रेसाठी लाभ प्राप्त करून देते व विचार सरणीत बदल घडतो असे मत विध्यार्थानी व्यक्त केले.

कार्यशाळेसाठी महाविदयालयाचे  प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य संजय दहाड आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रज्ञा विखार, विभाग प्रमुख किरण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ . सुनंदा पाटील, प्रा . विजय चौधरी, प्रा. हर्षा भंगाळे, प्रा. स्नेहल भंगाळे यांनी सहकार्य केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here