विद्यापीठात बौध्द पौर्णिमे निमित्त ‘दान परमिता’ कार्यक्रम उत्साहात

0
39

साईमत जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेमार्फत बौध्द पौर्णिमे निमित्त दान परमिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानस्त्रोत केंद्राचे माजी संचालक डॉ. अनिल चिकाटे उपस्थित होते. प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी अभिधम्म:चर्चा व चिंतन या विषयावर विचार मांडले. बौध्द धम्मात दानाला महत्व असल्याने डॉ.म.सु.पगारे लिखित ग्रंथ यावेळी विविध विभागांना देण्यात आले.
डॉ. पगारे आपल्या भाषणात म्हणाले की, कुठल्याही मोहाची अपेक्षा न ठेवता आपण जे ज्ञानदान करतो ते मनाला समाधान देणारे असते. अभिधम्मपिटकामध्ये चित्त, निब्बाण,चेतसिका व शिल यांना महत्व आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पारधे यांनी केले. बौध्द अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी प्रमुख डॉ. संतोष खिराडे यांनी आभार मानले. यावेळी प्रा.जे.बी.नाईक, डॉ. अजय पाटील,प्रा. आशुतोष पाटील, मनोज पाटील, डॉ. यशोदिप पाटील, डॉ. दिपक खरात, डॉ. सुदर्शन भवरे, उज्वला लांडगे, बाळासाहेब सुर्यवंशी, डॉ. अभय मनसरे, राजू सोनवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here