बोदवड येथे माथेफिरू तरुणाने कुट्टीचे शेड व मोटारसायकल पेटवली

0
12

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी 

बोदवड शहरातील माळीवाडा भागात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना प्रकाश माळी वय ३४ याने त्याच्या विरुद्ध पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग ठेऊन योगेश सुभाष माळी वय ३६ यांचे घरासमोर येऊन शिवीगाळ सुरू केली आणि त्याच वेळी रस्त्याने हिरो होंडा एच एफ डीलक्स क्र.एम एच २० एफ के ४२६४ मोटरसायकलने जाणारे अनिकेत श्रावण उमाळे, गणेश रामा देवरे रा रेवती यांना अडवले व दगडाने मारण्याचा धाक दाखवून पळवून लावले व त्या मोटरसायकलची पेट्रोलनळी काढून त्यातील पेट्रोल बाटलीत घेऊन योगेश माळी यांचे घरासमोरील चारा कुट्टी भरलेले कुट्टीचे शेड पेटवून दिले व उरलेले पेट्रोल मोटारसायकलवर टाकुन पेटवून दिली .या माथेफिरूने योगेश माळी यांचे सुमारे दिड लाख रुपयांचे तर चाळीस हजार रुपयांचे नुकसान केले. हा सर्व घटनाक्रम जवळील घराचे सी सी टी व्ही कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे .या बाबत योगेश माळी यांचे फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here