साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्रि गावी शेतकऱ्याच्या कापूस मोजणीत मापात केल्या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने दंडात्मक कारवाई केली.
प्रशासक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चोपडा गायकवाड यांनी 11000 रुपये दंडाची आकारणी कापूस व्यापाऱ्याकडून केली.
यावल तालुक्यात पांढऱ्या सोन्याची म्हणजे कापूस खरेदी करताना मापात पाप करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे.एका शेतकऱ्याने कापूस व्यापाऱ्याची लबाडी प्रत्यक्ष पकडून तक्रार केली असता सहाय्यक निबंध सहकारी संस्था चोपडा हे सध्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आहे.
त्यांनी या वृत्ताची दखल घेत संबंधित व्यापाऱ्याची माहिती घेतली व 11 हजार रुपये दंडाचे आकारणी केली असून या आकारणीमुळे यावल तालुक्यात अशा व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यात यापुढे अशा काही व्यापाऱ्यांचा संशय आल्यास तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी कळविले आहे.