साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील शिधा वाटप करणारे दुकानदार आधारला शिधापत्रिका लिंक करण्यासाठी जादा पैसेची मागणी करत असल्याची माहिती प्रहार संघटनेच्या पदाधिका-यांच्या लक्षात आल्याने प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित तहसीलदार घोरपडे यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी करणायची मागणी केली व निफाड तालुक्यातील सर्व राशन दुकानात आधारला शिधापत्रिका विनामूल्य करण्याचा मोठा बोर्ड लावण्यात यावा जर रेशन दुकानदार पैसेची मागणी करतांना आढळल्यास सदर रास्तभाव दुकान परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदनात म्हंटले आहेत. त्यावेळस तहसील अधिकारी टर्ले व कापसे यांनी आश्वासन दिले की आपल्या निवेदनावर योग्य कार्यवाही कारण्यात येईल.
त्यावेळेस प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष सोमनाथ धुमाळ, प्रहार युवा आघाडी तालुकाध्यक्ष जयेश जगताप, प्रहार जनशक्ती शहरध्यक्ष संदीप क्षीरसागर, उपाध्यक्ष बापूराव राऊत, राजाराम दुसाने, विकास खडताळे, ज्ञानेश्वर आढाव,राजेंद्र हारगावकर,उज्ज्वला कुशारे, शीतल पानपाटील,सुदान देशमुख, रत्नाकर दुसाने,रोशन तिडके व प्रहार सैनिक उपस्थित होते.