साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील नळकांडी पूल थेट जमिनीत पुरल्या गेल्याचा प्रकार रविवारी वाहनधारकांच्या लक्षात आला आहे त्यामुळे रविवारी या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती..नलकांडी पुलाच्या नळकांड्याही जमिनीत पुरल्या गेल्या आहे त्यामुळे आगामी पावसाळ्यात नलकांडी पुलाच्या बाजूने असलेल्या शेती शिवाराला धोका निर्माण झालेला आहे.
सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावर घोसला गावाजवळ खटका लीच्या नाल्यावर जिल्हा परिषदेच्या नलकांडी पूल उभारण्यात आलेला आहे या पुलाची तीन वर्षांपासून जमिनीपासून तीन फूट होती,परंतु हा तीन फूट उंचीचा पूल मात्र अचानक जमिनीत पुरकय9 गेल्याचा प्रकार उघसडकीस आला असून या पुलाच्या नलकांड्या ही जमिनीत गाडल्या गेल्या आहे आधीच या पुलाच्या नलकांड्या मध्ये दोन वर्षांपासून घाण अडकल्याने या पुलाच्या नाल्याच्या काठाने असलेल्या शेती पिकांचे पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाल्याच्या घटना उघसकीस आलेल्या आहे परंतु अद्याप एकदाही या पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचे शेतकरी सुधाकर युवरे यांनी सांगितले आहे दरम्यान रविवारी हा पूल अचानक जमिनीत गाडल्या गेल्या चा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे..त्यामुळे दुपारपासून या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती हा पूल कुचकामी झाल्याचा अफवांना पेव फुटले होते.
पुलाच्या नलकांड्या जमिनीत
दरम्यान घोसला गावाजवळील खटकाळी नाल्या वरील जिल्हा परिषदेच्या हा पूल दोन वर्षांपासून धोकादायक स्थितीत पडलेला आहे ग्रामपंचायतीचा वतीने अनेकदा या पुला बाबत तक्रारी केल्या असल्याचे ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा ताई वाघ यांनी सांगितले परंतु तरीही संबंधित प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचा आरोप सुवर्णाताई वाघ यांनी केला आहे.
पुला साठी मागील अतिवृष्टीच्या कालावधीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनही केले होते त्यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने महसूल आणि सोयगाव पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन निवलले होते परंतु त्या दरम्यान आंदोलक ग्रामस्थांना दिलेले आश्वासन हवेत विरले आहे त्यामुळे या पुलाची दुरुस्ती न झाल्याने पूल जमिनीत गाडला गेला असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
दोन वर्षापूर्वी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी या नलकांडी पूलाच्या बाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी थेट जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात धडक मारून लेखी निवेदन दिले आहे परंतु त्या वेळीही संबंधित विभागाने वेळ मारून नेली आहे या नलकांडी पुलाला अचानक भूगर्भात समाधी घेण्याची वेळ आली असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीला धोका झाला असून तातडीने या जमिनीत गेलेल्या पुलाची पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
१) शांताराम सोनार-
या पुलाच्या काठावर माझी शेत जमीन आहे अतिवृष्टी असो का पाऊस दरवर्षी माझ्या शेतातील पिकांची नुकसान होते मला भरपाई तर दूरच परंतु पुलाची दुरुस्तीही होत नाही त्यामुळे शेती विकणे हाच पर्याय शिल्लक आहे.
२)-सुधाकर युवरे
पुलाच्या पाण्याच्या प्रवाहावर च माझ्या शेतीचा बंधारा आहे किंचित पूर आला तरीही माझे शेतात पाणी शिरते याबाबत मी नुकसानी साठी तहसिल कार्यालयात तक्रार केली की मला अतिवृष्टीचा निकष दाखवून नुकसान भरपाई पासून डावलण्यात येते त्यामुळे खटकाळी नाल्या जवळ शेती करणे म्हणजे जिकरीचे झाले आहे.
३)खटकाळी नाल्याच्या पुराबाबत उपाय योजना करण्यासाठी अनेकदा जिल्हा परिषद व महसूल विभागाला ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन कारवाई साठी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली आहे तरिही उपयोग झालेला नाही या पुला मुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्ना वर परिणाम झालेला आहे.
सुवर्णा ताई वाघ
माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य
दरम्यान खटकाळी नाल्या वरील पूल अचानक जमिनीत गाडल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला असता या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी संपर्क केला असता रविवार च्या सुटीमुळे संपर्क झाला नव्हता.