अज्ञात वन्य प्राण्यांच्या प्रवेशाने कजगावात घबराट

0
37

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथील सावता माळी चौक परिसरात अज्ञात वन्य प्राण्यांच्या प्रवेशाने चांगलीच धडकी भरली आहे. हा प्राणी कोणी उद मांजर तर कोणी रान मांजर तर कोणी भलतंच काही सांगत आहे, अशी वेगवेगळी चर्चा होतांना दिसत आहे. मात्र नेमका हा प्राणी कोणता यावर अजूनही स्पष्ट झाले नाही, हा प्राणी रात्री अपरात्री जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

त्यामुळे नागरीकांनी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे वनविभागाने ह्या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन ह्या विषयी असलेली ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करावी व ह्या अज्ञात प्राण्यांचा शोध घेऊन त्याला त्वरीत पकडावे अशी मागणी जोरदार होत आहे ह्याबाबतीत वनविभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here