साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या सूचनेप्रमाणे गावठी दारू विरुद्ध मोहीम सुरू केली आहे आज सकाळी बोदवड पोलिसांनी शेलवड येथे गावठी दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे.
तीन दिवसापूर्वी बोदवड शिवारातील दारू नष्ट केल्यानंतर आज सकाळी ७.३० सुमारास तालुक्यातील शेलवड शिवारातील कुरण तलावाजवळ आनंद गुलाब धुलकर वय ३५ राहणार भीलवाडा बोदवड यांच्या ताब्यातील ४ ड्रम कच्चे ८०० लिटर कच्चे रसायन व २०० लिटर उकळते पक्के रसायन चालू भट्टी व ८० लिटर तयार हात भट्टी दारु वरील तयार दारू सह १३ हजारांचा मुद्देमाल मिळून आला हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला करत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५( फ ).(ब) क अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
ही कारवाई सहा पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस हवालदार आयुब तडवी, पोलीस नाईक गजानन काळे, संदीप वानखेडे, पोलीस अंमलदार दीपक पाटील ,मुकेश पाटील ,निखिल नारखेडे, भगवान पाटील, निलेश शिसोदे, सचिन चौधरी, आदींनी केली.