साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी
आज सकाळी झालेल्या अपघातात अमळनेर चे सहा-गटविकास अधिकारी पंचायत समिति अमळनेर तथा गटविकास अधिकारी पंचायत समिति यावल एकनाथ चौधरी यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की , गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला अमळनेर – धुळे या मार्गाने आपल्या एमएच.१९.डीव्ही. ४१९९ नंबरच्या शासकीय वाहने निघाले होते धरणगाव तालुका येथील भोणे फाट्याजवळ त्याच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात ड्राइव्हरच्या बाजूला बसलेले एकनाथ चौधरी यांच्या जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्याचे रहिवाशी असून हल्ली ते अमळनेरचे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते व त्याच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार होता.