साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
यावल वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करण्यासाठी म्हणजे वारस लावण्यासाठी महसूल मधील एका कर्मचाऱ्यांने आपल्या ओळखीच्या मध्यस्थी दलाला मार्फत अर्जदाराकडून ‘फोन पे’ च्या माध्यमातून वेळोवेळी 55 हजार रुपये घेऊन वारस नोंद न करता पुन्हा 2 लाख 47 हजार रुपयाची मागणी केल्याची तक्रार यावल तालुक्यात फैजपुर पोलीस स्टेशनला देण्यात आली.प्रकरण गंभीर असले तरी फैजपूर पोलिसांनी मात्र गुन्हा नोंद करणे संदर्भात नकार दिल्याचे तक्रारदारास सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात दिगंबर रामदास भोगे वय 50 धंदा शेती रा. निंभोरा ता.रावेर यांनी जमिनी नावावर करण्यासाठी फसवणूक केल्याच्या विषयांन्वये केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, रावेर तालुक्यातील निंभोरा शिवारातील एकूण चार शेत गट नंबरचे मालक म्हणजे तक्रारदार चे वडील रामदास मिठाराम भोगे हे मयत झाल्याने माझे नाव वारसांनी लावण्यासाठी अर्ज दिला आहे.
सदर प्रकरणी फैजपूर येथील उपविभागीय कार्यालयातील लिपिक शरीफ तडवी याने आपले खास विश्वासातील मध्यस्थी, दलाल यावल तालुक्यातील युनिस तडवी मोबाईल क्रमांक 99 22 77 50 37 याचे माध्यमातून वेळोवेळी एकत्रित 55 हजार रुपये ‘फोन पे’ द्वारे घेतले आहे.
शुक्रवार दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यस्थी असलेला युनिस तडवी यांने मला उपविभागीय कार्यालयातील शरीफ तडवी या लिपिकास भेटण्यासाठी बोलावले सदर भेटी दरम्यान शरीफ तडवी यांनी मी प्रथम प्रकरणासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र खोटे दाखवून मी आपणावर फौजदारी गुन्हा दाखल करतो व सदर जमीन आपणास मिळू शकत नाही व भविष्यात आपण शेत जमीन कसू शकत नाही अशी धमकी देत आणखी 2 लाख 47 हजार रुपये मला द्या व ही सर्व रक्कम मध्यस्थी यूनुस तडवी यांच्याकडे त्वरित जमा करा असे म्हटले.
तरी सदर अन्याय अत्याचारास कंटाळून मी आज दि. 4 नोव्हेंबर रोजी आपणाकडे संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कार्यवाहीची मागणी करीत आहे या सोबत मी ‘फोन पे’ स्टेटमेंट जोडत आहे तसेच युनिस तडवी व शरीफ तडवी यांच्या भ्रमणध्वनी संपर्क संभाषणाची चौकशी व्हावी व पुढील योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती दिगंबर रामदास भोगे यांनी फ़ैजपुर पोलिसात दिलेल्या लेखी तक्रार अर्जात केली,समक्ष तथा साक्षीदार म्हणून दोन व्यक्तीची नावे अर्जावर आहेत.
गंभीर स्वरूपाचे प्रकरण असताना तसेच लेखी तक्रार व समक्ष तसेच साक्षीदार असताना फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचे तक्रारदारांनी सांगितले.
फैजपूर उपविभागीय कार्यालयात कर्तव्यदक्ष असे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग असताना त्यांची दिशाभूल करून त्यांना माहिती न देता,त्यांच्याकडे तक्रारदारास जाऊ न देता मीच तुमचे काम करून देईल असे सांगून त्यांच्या कार्यालयातील लिपिक मध्यस्थीमार्फत लाखो रुपयाची मागणी करतात या गंभीर प्रकरणाची चौकशी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी फैजपूर पोलिसामार्फत करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी असे यावल,रावेर तालुक्यात बोलले जात आहे.