Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव सा.बा.उत्तर विभागातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर !
    जळगाव

    जळगाव सा.बा.उत्तर विभागातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर !

    SaimatBy SaimatOctober 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

    जळगाव सा.बा.उत्तर विभागातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे विशिष्ट ठेकेदारांना झुकते माप दिले जात असल्यामुळे अनेक ठेकेदारांनी बंड पुकारले असून मंत्रालयापर्यंत तक्रारी सुरु झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

    जळगाव सा.बा.उत्तर विभागातील कामे काही दिवसांपासून बीएनए भुसावळ याच एजन्सीला दिली जात आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी निघालेल्या ई-टेंडरची बहुतांश कामे देखील बीएनएलाच देण्यात आली. त्यामुळे इतर ठेकेदार कमालीचे संतप्त झाले आहे. जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बीएनएच्या गुणवत्तेच्या कामाचा दाखला दिला जातो. परंतू बाकीचे ठेकेदार गुणवत्ता पूर्वक कामे करत नाही का?, असा सवाल उर्वरित ठेकेदारांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, याबाबत आता पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखील तक्रारी सुरु झाल्या आहेत.

    याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने कार्यकारी अभियंता  यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. तसेच या विषयावर बोलतांना त्यांना जरा संयम सुटल्या सारखे दिसून आले. तर दुसरीकडे मात्र, ठेकेदार आक्रमक झाले आहेत.

    अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी याप्रकरणी वेळीच लक्ष न घातल्यास या वादाचे पडसाद मोठ्या प्रमाणात जिल्हा पातळीवर उमटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जळगाव सा.बा.उत्तर विभाग हा कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतो. अगदी यातून मागील काही अधिकाऱ्यांना जेलवारी देखील करावी लागली होती. त्यामुळे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी या विषयात लक्ष घातल्यास हा वाद संपुष्टात येऊ शकतो. परंतू दुर्लक्ष झाल्यास मोठा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Maharashtra Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; १५०० रुपयांचा हप्ता खात्यात येण्यास प्रारंभ

    March 27, 2026

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.