साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात पवित्र असा दुर्गोत्सव साजरा करताना अनेक ठिकाणी दुर्गोत्सव मंडळाजवळ सट्टा,पत्ता क्लब आणि बनावट देशी,गावठी,पन्नीची दारू सर्रासपणे खुलेआम विक्री होत आहे.यामुळे दुर्गादेवी आणि पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांनी अवैध धंदे चालकांना परवानगी दिली आहे का ?याबाबत समाजात तालुक्यात बोलले जात आहे.
काल दि.२७ रोजी रात्री एका दुर्गोत्सव मंडळाजवळ पत्त्याचा क्लब सुरू असताना दुसर्या बाजूला त्याच ठिकाणी मद्यप्राशन करणार्या काही तरुणांनी दुर्गा देवीच्या आणि म्हसोबाच्या साक्षीने रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान एका मुलीची छेड़खानी केली.त्यामुळे सट्टा,पत्ता आणि बनावट देशी व गावठी,पन्नी दारू सर्रासपणे खुलेआम आणि तेही ठराविक ठिकाणी विक्री होत असल्याने यांना पोलिसांनी कोणत्या नियमानुसार परवानगी दिली?दुर्गोत्सव मंडळ आणि ठराविक ठिकठिकाणी आणि पोलीस आणि होमगार्ड बंदोबस्त आहे किंवा नाही? दुर्गोत्सव काळात पोलिसांची रात्रीची गस्त होत नाही का?आणि बंदोबस्त गस्त होत असेल तर दुर्गोत्सव मंडळाजवळ जे अवैध धंदे सुरू आहेत त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलीस अधीक्षक जळगाव,गुन्हे अन्वेषण विभाग जळगाव आणि फैजपूर भाग डीवायएसपी यांनी आपले लक्ष केंद्रित करून अनेक ठिकाणी एकाच वेळेला धाडी टाकून थातूरमातूर कारवाई न करता प्रत्यक्ष अवैध धंदे करणार्या(इतर दुसर्या पत्ता खेळणार्यांवर कारवाई न करता)मूळ जबाबदार मालकांवर क्लब चालवण्यार्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.