साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी
शिक्षक दिन,मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन,स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यांच्या निमित्त सोयगांव शिक्षक भारती यांनी शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन सोयगांव तालुक्याचे तहसीलदार मा.रमेश जशवंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार रमेश जशवंत यांनी शिक्षक भारती,सोयगांव यांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले.यावेळी सोयगांव नगराध्यक्षा आशाबी तडवी,शिक्षण विस्तार अधिकारी सचिन पाटील,प्रशाला सोयगांव मुख्याध्यापक गिरिष जगताप,सोयगांव केंद्र प्रमुख फिरोज तडवी,नितीन राजपूत केंद्र प्रमुख बनोटी,गोपाल पाटील केंद्र प्रमुख जरंडी,विकास पवार मुख्याध्यापक बनोटी,रामदास फुसे,अनिल ठाकूर,समाजसेेवक राजेंद्र दुतोंडे,नगरसेवक गजानन कुडके,राजू माळी,योगेश बोखारे मान्यवर प्रमुुख अतिथी म्हणूून उपस्थित होते.या शिबीरास जळगांव येथिल डाॅ.केतन बोरोले M.S.D.N.B
( मेंदू विकार तंज्ञ व मणका विकार शस्ञक्रिया तंज्ञ) , डाॅ.नेहा भंगाळे M.D. Medicine (हॄदयरोग,रक्तदाब,मधुमेह,था यराॅइड,दमा,टी.बी. व छातीचे आजार,कावीड व लिव्हरचे आजार,डेंग्यू,मलेरीया,टायफाईड) डाॅ.गौरव महाजन M.B.B.S.M.D.बालरोग तज्ञ , डाॅ.चेतन पाटील M.B.B.S.D.N.B. नञरोग तज्ञ, डाॅ.राहूल चौधरी यांनी तपासनी केली.या आरोग्य तपासणी शिबीरात जवळपास शिक्षक,पालक,विद्यार्थी मिळून 571 रूग्णांची तपासणी करण्यात आली.
यात 214 रुग्णांची तर 172 मेंदु व मणका रुग्णांची तर 105बाल रूग्णांची तर 80इतर रुग्णांची तपासणी करण्यात आली.याशिबीर यशस्वीते साठी शिक्षक भारती तालुकाध्यक्ष किरणकुमार पाटील, कार्याध्यक्ष महेश गवांदे,रवींद्र तायडे,दौलत परदेशी,किशोर जगताप,नितेश गवांदे,बटेेसिंंग वसावे,सतिष माळी यांनी अथक परिश्रम घेतले असून.या शिबीरास तालुक्यातील शिक्षकां मध्ये कौतुकाचा विषय झाला आहे.अशा प्रकारे एका शिक्षक संघटनेने शिक्षक, पालक, विद्यार्थी साठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन महाराष्ट्रात प्रथमच करण्यात आल्याने शिक्षक, पालकां कडून या शिबीराचे कौतुक होत असून शिबीरास शिक्षक सेना तालुकाध्यक्ष रवींद्र शेळके,सुभाष सोनवणे,विजय सोनवणे,सुपडू सोनवणे,सुनिल बावचे,प्रमोद कठोरे,भाऊसाहेब पाटील,सुनिल सूर्यवंशी,ए.बी.पाटील यांच्या सह अनेक शिक्षकांनी भेट दिल्या.