साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन करण्यात आले. मराठा समाजाच्या संतापाची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी निलंबनाचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणात बकालेंवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. मराठा समाजातील अनेक संघटना आक्रमक झाल्या. यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची आधी बदली करण्यात आली लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना निलंबित करण्यात आले.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या प्रकरणात अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीचा सविस्तर अहवाल लवकर सादर करावा असाही आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी दिला आहे. नियमानुसार कारवाई सुरू आहे. कोणीही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस दलाला सहकार्य करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.