Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोरा येथे अवतरले काशीचे विश्वेश्वरनाथ मंदिर
    पाचोरा

    पाचोरा येथे अवतरले काशीचे विश्वेश्वरनाथ मंदिर

    SaimatBy SaimatSeptember 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी

    पाचोरा येथे यंदाच्या गणेशोत्सवात मोक्षभूमी असलेल्या काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली असून बंगाली कारागिरांच्या अथक परिश्रमातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र युवा नेते सुमित पाटील यांच्या निर्धारात्मक कल्पकतेतून ही आरास साकारण्यात आल्याने भाविकांना खऱ्या अर्थाने येथे दर्शन घेऊन काशी केल्याचे आत्मिक समाधान लाभणार असल्याने भाविकांचे आकर्षण वाढले आहे.

    मानसिंगका मिलच्या प्रांगणात आमदार किशोर पाटील यांच्या प्रेरणेने सुमित पाटील यांनी काशीच्या विश्वेश्वरनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी बंगाली कारागिरांची मदत घेण्यात आली .गेल्या दीड महिन्यांपासून सुरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस बंगाली कारागरांचा जमू या जगप्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती येथे साकारत आहेत.

    देशातील प्रत्येक नागरिकाला काशी या पुण्यभुमीतील तीर्थक्षेत्रास जावेसे वाटते. काशी केल्याने जीवनात मोक्ष मिळतो अशी धार्मिक श्रद्धा असल्याने परंतु अनेकांना आर्थिक अथवा इतर कारणांमुळे काशी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपणच पांडव व भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पाचोरा पुण्यभूमीत काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची प्रतिकृती साकारावी या निर्धारात्मक संकल्पनेतून सुमित पाटील यांनी हा उपक्रम येथे राबवला आहे. सुमित पाटील यांनी याउपक्रमाच्या माध्यमातुन आपले कौटुंबिक ,धार्मिक व सांस्कृतिक संस्कार वृद्धिंगत केले आहेत. अंतुर्ली येथील पाटील कुटुंबीय गेल्या तीन पिढ्यांपासून विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच कुटुंबातील सुमित पाटील यांनी आपला हा कौटुंबिक वारसा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने पाचोरा येथे काशीच्या विश्वेश्वरनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याच्या विचारास मूर्त रूप दिले आहे. मुंबई व्यतिरिक्त असा विश्वेश्वर मंदिराचा भव्य देखावा उत्तर महाराष्ट्रात साकारण्यात आलेला नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना काशी येथील विश्वेश्वरनाथांच्या दर्शनाची अनुभूती व्हावी व त्यांनाही आपण काशी करून मोक्ष मिळवण्याचा आनंद व्हावा व त्यांची काशी केल्याची इच्छा पूर्ण व्हावी या हेतून मंदिराची प्रतिकृती साकारली असून हजारो भाविकांना या निमित्ताने काशीचे दर्शन घडविण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद असल्याचे सुमित पाटील यांनी स्पष्ट केले.

    गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात दिवसभर हे मंदिर दर्शनासाठी खुले राहील भाविक महिला पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून ज्या मानसिंगका मिलचा गणपती परिसरात प्रसिद्ध मानला जात होता त्याच ठिकाणी या मंदिराची प्रतिकृती साकारून हा धार्मिक ठेवा कायम ठेवला असल्याचे स्पष्ट केले. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सुमित पाटील, समाधान पाटील यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.