ओझर शहरात असलेल्या खड्डयामुळे गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूका रद्द ..

0
14

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी 

आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओझर पोलीस स्टेशन च्या वतीने शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती.मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. यंदा सरकार ने कोरोनाचे सर्व निर्बध हटवले आहेत परंतु गणेश उत्सव साजरा करताना सर्व प्रकारच्या परवानगी घेणे गरजेच्या आहेत. नियमांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अर्जुन भोसले यांनी सांगितले. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘राज्य शासनाने यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा. असे जाहीर केल्यानंतर अनेकाचा असा समज झाला आहे की, डॉल्बीला परवानगी मिळाली आहे. मात्र असे नाही. दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक कडक निर्बंध होते. केवळ ते निर्बंध उठवले आहेत. डॉल्बीसारख्या वाद्याला परवानगी नाही. केवळ दोन टॉप दोन बेस लावावे त्याची आवाजाची मर्यादा ७५ ते ९० डेसिबलपर्यंतच असावी. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका काढू नये. अर्जामध्ये मिरवणुकीचा दिवस आणि मार्ग याबरोबर वाद्यांचाही उल्लेख करावा. जातीय तेढ निर्माण होईल अशा डिजिटल फलकांची उभारणी करू नये.यावेळी ओझर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेश मंडळाची तसेच गणेश मूर्ती विक्रेते आणि साउंड सिस्टम वाले यांना निमंत्रण देण्यात आले होते.

ओझर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अशोक रहाटे,ओझर पोलिस स्टेशन गोपनीय दिपक गुंजाळ, जितेंद्र बागुल, महावितरण कंपनीने आधिकरी, तसेच ओझर नगर परिषदेचे कर्मचारी, प्रकाश महाले,प्रशांत पगार,राकेश जाधव,मनिष मंडलिक,कांचन जाधव पप्पु खोतकर,नितीन पवार,जुनेद शेख, जाफर पठाण, शब्बीर खाटिक, तसेच ओझर पंचक्रोशीतील नागरिक आणि ओझर गावातील गणेश उत्सव मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते.

ओझर शहरामध्ये सर्व मंडळाचे कार्यकर्ते गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात.उत्सव साजरा करीत असताना त्याला गालबोट लागेल असे कृत्य कोणत्याच मंडळ कडून घडणार नाही. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर गणेश उत्सव साजरा होत असताना पोलिस प्रशासनानेही टोकाची भूमिका न घेता सहकार्य करावे.

संपूर्ण ओझर शहरातील रस्त्यावर भले मोठे खड्डे असल्यामुळे या वर्षाची ओझरच्या राज्याचा आगमन सोहळा आणि विसर्जनची मिरवणुक रद्द करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here