Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»एव्हरग्रीन हॉटेलात पुन्हा एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेमीयुगुलांचे स्थान बनले
    क्राईम

    एव्हरग्रीन हॉटेलात पुन्हा एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेमीयुगुलांचे स्थान बनले

    SaimatBy SaimatAugust 19, 2022Updated:August 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह गोंदिया प्रतिनिधी 

    ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजा परिसरातील एव्हरग्रीन हॉटेलात १८ ऑगस्टच्या रात्री एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी असून त्याला उपचारसाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

    शतक जांगळे (२१) रा. फुलचूर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण कळू शकले नाही. तो बेशुध्द असून त्याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या एव्हरग्रीन हॉटेलात नागपूरच्या एका तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत रात्र घालवून रात्रीच विषप्राशन करून दोघांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आमगावच्या बजरंग चौकात राहणाऱ्या २१ वर्षाच्या तरूणाने आमगावातील एका २० वर्षाच्या तरूणीवर बलात्कार केला होता. या दोन्ही घटनांची नोंद गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात आहे.

    आता शतक जांगळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण काय हे कळू शकले नाही. याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस त्याचा जबाब घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. परंतु तो बेशुध्द असल्याने २४ तासांपर्यंत जबाब घेण्यास डॉक्टरांनी मनाई केली. यापूर्वीही शतक जांगळे याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. दोन महिन्यापूर्वी वडीलांनी गाडी घेऊन दिली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न शतकने केला होता असे ठाणेदार दिनेश तायडे यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.