मुक्ताईनगर येथे स्वराज्य महोत्सवाअंतर्गत ‘सामूहिक राष्ट्रगीत गायनयन मोठ्या उत्साहात संपन्न (व्हिडीओ)

0
18

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात १७ ऑगस्ट २०२२ म्हणजे आज सकाळी ११ ते ११:०१ या काळात सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे जे जिथे असाल तिथेच उभे राहून या उपक्रमात सहभाही होऊ होण्याचे आवाहन करण्यात आले होते. सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानुसार मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या १०० फुटी राष्ट्र ध्वजा जवळ आज बुधवारी पुन्हा सामूहिक राष्ट्र गीत गायनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी त्यांचे व्यापारी प्रतिष्ठाने व रिक्षा चालक , प्रवासी तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेत सामूहिक राष्ट्र गीत गायन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू केले आहे. या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते त्याला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळाला असून एक देशभक्तीची ज्वाजल्य उदाहरण आज पुन्हा दिसून आले.

नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर आली आहे, या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान-थोर, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याचे दिसून आले नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभाग घेतला होता.

यांनी घेतला होता सहभाग :
आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे , नगरसेवक तथा गटनेता पियूष मोरे, पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे, सार्वजनिक बांधकाम सभापती संतोष मराठे, दिलीप पाटील सर, नितीन जैन, बबलू सापधरे, प्रवीण चौधरी, संतोष माळी, अविनाश बोरसे, शे. इस्माईल खान, पंकज राणे, हारून शेख, वसंत भलभले, किरण कोळी, अनिल तळेले,राजेंद्र तळेले, बापू ससाणे, निलेश पाटील,प्रदीप साळुंखे, धनंजय सापधरे, अर्जुन भोई, दीपक नाईक , अशोक कुंभार आदींसह असंख्य नागरिक तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, व आशा सेविकांनी तसेच रिक्षा चालक, प्रवासी, व्यापारी , व्यावसायिक, मजूर तसेच विविध प्रतिष्ठाने आदींनी राष्ट्र गीत गायनात सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here