साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
तालुक्यातील आमोदा येथे पशुधन पर्यवेक्षक हे कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने आणि आता त्यांनी जुलै महिन्यातील रजेप्रमाणे पुन्हा 9 ऑगस्ट पासून रजेचा अर्ज टाकल्याने आणि 50 किलोमीटर अंतरावरून पशुधन पर्यवेक्षक आता लिंपीला कसे रोखणार..? असे आमोदा परिसरातील 23 हजार पशुधन मालकांमध्ये बोलले जात आहे.याकडे जिल्हा पशुधन अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून कार्यवाही न केल्यास आमोदा तालुका यावल परिसरातून मोठे आंदोलन छेडले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गुरांना लिंपी या संसर्गजन्य आजाराची लागण होत असल्याची साथ निर्माण झाली आहे.
लिंपी या रोगाबाबत गुरांना मोफत लसीकरण किंवा लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातून योग्य ते मार्गदर्शन वेळेवर मिळायला पाहिजे आणि यासाठी यावल तालुक्यात आमोदा पशुवैद्यकीय दवाखान्यात पशु पर्यवेक्षक आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी कायम उपस्थित राहणे अनिवार्य असताना पशु पर्यवेक्षक हे जळगाव येथे रहिवास करीत असल्याने तसेच गेल्या महिन्याप्रमाणे काल दि.9ऑगस्ट पासून पुन्हा ते पशुवैद्यकीय दवाखान्यात उपस्थित नसल्याने सुट्टीवर गेल्याचे समजले,पशु पर्यवेक्षक यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्यासाठी आमोदा गावात नाममात्र निवासस्थान कागदोपत्री नमूद करून प्रत्यक्षात मात्र जळगाव येथे राहुल अपडाऊन सुरू असते दवाखान्यात अनियमित उपस्थिती राहत असल्याने पशुधन मालकांची मोठी गैरसोय होत आहे,उपस्थित कंपाउंडर यास मर्यादित ज्ञान व अधिकार असल्याने पशु धनमालकांचे समाधान होत नसल्याने तसेच गुरांना पाहिजे त्या प्रमाणात औषधोपचार मिळत नसल्याने पशुधन मालक चिंताग्रस्त झाले आहेत याकडे जिल्हा पशुधन अधिकाऱ्याने तातडीने लक्ष केंद्रित न केल्यास आमोदा परिसरातून पशुधन मालक मोठे आंदोलन छेडणार असल्याचे बोलले जात आहे.