पाचोऱ्यात स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा रॅली

0
32

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी 

9 ऑगस्ट क्रांती दिन अमृतमहोत्सव पाचोरा नगरपालिका प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला. 9ऑगस्ट म्हणजे भारत स्वतंत्र अमृतमहोत्सव आहे.या निमित्ताने पाचोरा नगरपालिका प्रशासनानेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक मध्ये तिरंगी रांगोळी व फुलांची सुंदर सजावट करण्यात आली.क्रांती दिन म्हणजे दिनांक 8 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर, 9 ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 9 ऑगस्ट हा दिन क्रांती दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.पाचोऱ्यात शहरात देखील स्व. कै. माजी स्वतंत्र सैनिक दामोदर महाजन सुपडू भांदू रामनाराय थेपडे यांच्यासह अनेक सैनिकांनी तुरुंगवास भोगला.

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस हर-घर-तिरंगा अभियान राबविले जाणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस देशातील प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविणे बाबतच्या सुचना शासनामार्फत देण्यात आले, त्यानुसार पाचोरा शहरात तिरंगा ध्वज हा नगरपरिषद कार्यालय, राजे संभाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक इत्यादी ठिकाणी तिरंगा ध्वज वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभुमीवर नगरपालिकासमोर कै, स्वतंत्र सैनिक दामोदर लोटन महाजन यांच्या कॉन्सिलचे उद्घाटन मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला या आधी. पाचोरा एम एम कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्फत सायकल तर नगरपालिकेचे कर्मचारी यांनी तिरंगी टोपी टी शर्ट परिधान करून ‘भारत माता की जय वंदे मातरम्‌’, अशा घोषणा, देऊन भव्य शहरातून छत्रपती शिवाजी चौक जामनेर रोड गांधी चौक देशमुख वाडी याभागातून रॅली काढण्यात आली ,या नंतर हुतात्मा स्मारक येथे माजी जेष्ठ सैनिक मिस्तरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले ,आणि ज्या सैनिकानीं हुतात्मा पत्करले त्यांच्या वारसाचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाचोरा तहसीलदार कैलास चावळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर उपमुख्याधिकारी दगडू शिवाजी मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले,प्राचार्य डॉ वासुदेव वले बी एन पाटील ललित सोनार, माजी सैनिक अध्यक्ष दीपक पाटील बाळू पाटील नगरपरिषद कर्मचारीवर्ग पत्रकार संदीप महाजन सी एन चौधरी अनिल येवले गणेश शिंदे प्रशांत येवले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here