डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले तरुणाचे प्राण…

0
77

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

दिनांक 23 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास वाडी येथील युवक सोहेल शेख याला गाढ झोपेत अती विषारी जातीच्या मण्यार ह्या सर्पाचा चावा झाला होता. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत पाचोरा येथे सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ला ऍडमिट करण्यात आले. हॉस्पिटल चे डॉक्टर स्वप्निल पाटील दादा यांनी त्याला चेक केले.

सदर तरुण हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे वं त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले आणि सर्पदंशाची ट्रीटमेंट सुरु करण्यात आली. डॉ स्वप्निल पाटील दादा आणि त्यांच्या हॉस्पिटल टीम ने आपल्या ट्रीटमेंट आणि अनुभवाच्या जोरावर सोहेल ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. 5 दिवस हा तरुण व्हेंटिलेटर वर होता व दरम्यान 2 वेळा हृदय बंद पडल्यामुळे त्याला CPR देण्यात आला. काल त्या तरुणाला सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली. त्यावेळेस सोहेल च्या कुटुंबियांनी डॉ स्वप्निल पाटील दादा व त्यांच्या हॉस्पिटल स्टाफ ने सोहेल ला योग्य उपचार करून नवीन जीवनदान दिल्याबद्दल सत्कार करून आभार मानले. यावेळेस बनोटी येथील डॉ अजित पाटील व रहीम बागवान यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here