जळगाव पीपल्स बँकेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे विनामुल्य वाटप

0
17

जळगाव : प्रतिनिधी 

दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टिस्टेट शेडयुल्ड बँक आहे. सदर सामाजिक उत्तरदायित्वाच्या हेतूने 30 वर्षांपासून अविरतपणे जळगाव परिसरातील निवडक शाळांमधील गरीब, हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संचाचे विनामुल्य वाटप करीत असते.

यावर्षी सुद्धा जळगाव पब्लिक स्कुल, श्रीमती कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालय फैजपुर, श्रवण विकास मंदीर सावखेडा, हरीजन कन्या छात्रालय जळगाव, काशिबाई ऊखाजी कोल्हे विद्यालय जळगाव, आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा, अभिमन महादु वारके महाविद्यालय विदगाव, दादासो दामु पांडु पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव, न्यु इंग्लिश स्कुल नशिराबाद, जयहिंद विद्यालय कडगाव, सार्वजनिक विद्यालय असोदा, महात्मा गांधी विद्यालय भादली,  जळगाव शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.48 पिंप्राळा, सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद, प्राथमिक विद्या मंदीर खेडी बु, श्रीमती काशिबाई दामु भोळे प्राथमिक विद्यामंदीर असोदा या शाळांमधील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संचाचे विनामुल्य वाटप करण्यात आले. सदर वाटप दिनांक 12 ते 18 जुलै 2022 रोजी करण्यात आले. सदर साहित्य संचात वह्या, रजिस्टर, कंपास पेटी, विज्ञान, इंग्लिश व गणिताची सराव पुस्तिका, शब्दार्थ पुस्तिका इ. वस्तू असतात.

विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बँकेचे चेअरमन श्री.अनिकेत भालचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना रट्टा मारुन अभ्यास न करता समजून उमजून करावा जेणे करुन ते ज्ञान आपल्या कायम स्मरणात राहते असे मार्गदर्शन केले. तसेच बँक सदैव तुमच्या पाठीशी आहे असेही सांगितले.  बँकिंग क्षेत्रात अर्थकारण करीत असतांनाही बँक विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्धरित्या गरीब, गरजु व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच वाटप करीत असते याबद्दल शाळांनी बँकेचे चेअरमन व संचालक मंडळाचे आभार मानले.

बँकेतर्फे बँकेच्या विविध सेवासुविधांची माहिती देण्यात आली. वय वर्षे 10 वरील विद्यार्थ्यांना स्वत: आपल्या बँकेत बचत खाते उघडता येते आणि बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येईल. बँकेत युपीआय, मोबाईल बँकिग सुविधा, पिओएस स्वाईप मशिन सुविधा, आरटीजीएस व एनइएफटी सुविधा अशा त्वरीत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेची एटीएम कम डेबिट कार्ड सुविधा बचत तसेच प्रोप्रायटरी चालु खात्यावरही उपलब्ध आहे. बँक सीटीएस, आरटीजीएस, एनइर्ऐं टी, एसएमएस अलर्टस्‌ , इमेलवर खातेउतारा, लॉकर्स, एलआयसी, एसबीआय लाईफ,  आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स व स्टार हेल्थ इन्शुुरन्स च्या विमा योजना अशा विविध सेवासुविधा पुरवीत आहे.

सदर वाटपास बँकेचे चेअरमन श्री.अनिकेत पाटील, चेअरमन-व्यवस्थापन मंडळ व संचालक श्री.भालचंद्र पाटील, संचालक प्रा.विलास बोरोले, सौ.सुरेखा चौधरी, श्री. चंदन अत्तरदे, श्री.ज्ञानेश्वर मोराणकर, तज्ज्ञ संचालक श्री तरल शहा आणि बँकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here