Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आदर्शवत्‌, नातीचा वाढदिवस केला अनोख्या पद्धतीने साजरा
    जळगाव

    आदर्शवत्‌, नातीचा वाढदिवस केला अनोख्या पद्धतीने साजरा

    SaimatBy SaimatJune 30, 2022Updated:June 30, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     जळगाव ः प्रतिनिधी

    येथील समाजसेविका व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी आपल्या नातीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील अंगणवाडीतील  30 जुन रोजी सहपरिवार आणि आपल्या नातीच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थींनींना  दप्तरे वाटप केली.

    प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बऱ्याचदा आपण असे वाढदिवस खुप मोठ्या पद्धतीने व खर्चिक पद्धतीने साजरा करतो परंतु मनिषा पाटील यांनी या लहान बालकांची गरज ओळखून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना दप्तर वाटप करण्याचे ठरविले आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून त्यांनी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याबद्दल संदेशही दिला.
    यासाठी त्यांना घरातून आपल्या पतीची मुलांची व सुनांची देखील साथ लाभली आहे. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, मी सर्वांनाच आवाहन करू इच्छिते की, वाढदिवसासाठी वायफळ खर्च न करता तो पैसा ज्या गरीब मुलांना खरोखर शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्यांच्यासाठी करावा. यात दुग्धशर्करा योग म्हणजे ज्या प्रमाणे चंद्राच्या कलेप्रमाणे नात वाढू लागली तसे त्यांनी दरमहा एक वृक्ष लावून जोपासले व आज ती 1 वर्षाची होतांना त्यांनी पाच देशी वृक्षांचे रोपण सहपरिवार अंगणवाडी येथे केलें. याप्रसंगी लहान मुलांचा आवडीचा खाऊ वाटप करून आपल्या नातीचा वाढदिवस साजरा केला.यावेळी सरपंच सरला आहिरे , उपसरपंच बाळू चौरे, अंगणवाडी सेविका उज्वला चौरे, अंगणवाडी सुपरवायझर जया जाधव,छाया जाधव ,मंगला माळी ,सुशिला महाजन व इतर पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026

    Kerosene Distribution : गॅसटंचाईवर उपाय! राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी रॉकेल वाटप सुरू

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.